बाबाची किर्ती निराळी दुनिया पाहिली दिन दलित हो जनता निघाली ।।धृ।। पावन भुमी जन्म घेवूनी उद्धार केला या दलितांचा मायाच त्यांची निराळी ममता मिळली दिन दलित ।।धृ।। अन्यायाला वाचा फोडूनी केला त्यांनी संग्राम ऐसा ज्ञानाची ज्योत जळाली उजळुनि दिसली ।।धृ।। सत्यासाठी भीम लढला माणुसकीचा कलंक पुसला मनुची होळी ही केली जाळूनी टाकली ।।धृ।। देहाची ही रांगोळी केली दलितासाठी अर्पण केली वीराची गाथा निराळी गात चालली ।।धृ।। बौद्ध धम्म देऊनि बाबा उजळामध्ये आणले आम्हा बुद्धाची वाणी मिळाली धन्य जाहलो ।।धृ।। बाबा होते माय बाप दलितांचे ते होते हात बाबाची चिंता जळाली आक्रोश केला दिन दलित हो जनता निघाली ।।धृ।।