lyrics
(Intro - Chorus)
खामगावची जनता जरा ध्यान देवून एका,
मागील दहा वर्षात झाला तालुका भकास,
खाल्या सगळ्या योजना करू या तपास,
टक्क्यावर साहेबांचे जोर होता सुरु,
लागली तरुण पोर नोकरीला फिरू.
(Verse 1)
काय सांगू या भकास ची गोष्ट,
जनतेचे पैसे खाऊन केले याने कष्ट,
जनता म्हणते आमदार जरा कमी फेका,
खामगावची जनता जरा ध्यान देवून एका.
रस्ते सगळे याच्या ठेकेदार मित्राने खाल्ले,
मेले ते सर्व जे यावर बोल्ले,
बघा बघा या फुंडकर चे काम,
याने जनतेचा लावला चाराने दाम.
सांगा तरी जनतेने किती सोसावं,
खामगावची जनता जरा ध्यान देवून एका.
(Chorus)
खामगावची जनता जरा ध्यान देवून एका,
साहेबानी संपत्ती दहा वर्षात चार पट केली,
खामगावची जनता विकासाच्या बोंबा मारून मेली,
खामगावची जनता जरा ध्यान देवून एका.
(Verse 2)
मतदान केले होते आम्ही तुमच्या वादयावर,
बसवला विकास तुम्ही धाब्यावर,
शिक्षण, रोजगार याने तालुक्यातून पळवले,
याच्या भरोशावर पैसे मिळवले.
काळात तुमच्या शहरातले पाणी गेले,
पाण्या अभावी तालुक्यात किती जनावर मेले,
खामगावची जनता जरा ध्यान देवून एका,
सांगा सांगा मतदान करायचं कसं?
पैशे टाकून तुम्ही भरले लोकांचे खिसे,
आता जनता तुम्हाला भुलणार नाय,
केलेल्या भ्रष्टाचाराला सोडणार नाय,
आता वेळ झाली तुमची घरी बसण्याची,
भाजपला हरवायला, कंबर कसण्याची.