تم إنشاء الموسيقى بواسطة Zendu Wala باستخدام Suno AI
Paus
@Zendu Wala
2024-06-13T05:53:23Z
Paus
@Zendu Wala
2024-06-13T05:53:23Z
كلمات
आलास का रे पावसा.. आलास का रे पावसा हिरवा रंग द्यायला या झाडवेलींना सोबत द्यायला या चिखलात खेळणाऱ्या मुलांना कशाला आणतोस सोबत ती अंगावर शहारे आणणारी हवा, पाहिजे असतात मग सर्वांना तेल पिऊन फुगलेली ती भजी अन् तो वाफाळलेला गरम चहा अंघोळ घालून टाकतोस या वेड्यावाकड्या रस्त्यांना पुन्हा करतोस तरुण या सिमेंटच्या वस्त्यांना आठवणी होतात जागी ती पाण्यातील कागदी होडी, अन् शांत झोप आणणारी ती पाऊस-पात्रांची जोडी आलास का रे परत मायेची फुंकर माराया या निर्जीव मातीत जीवन ओताया या कृतघ्न मनुष्य जातीत